चला मिळून सर्वजण सुसंवाद साधू या…

दिल से…

नमस्कार मंडळी,

मागच्या अंकात तुमच्याशी संवाद साधताना, तुम्हा सगळ्यांना आपल्या वर्षभराच्या अंकांची रूपरेषा साधारणतः काय असेल ह्या बाबत कल्पना दिली होतीच. Know Your Business ह्या थीम वर आधारित विविध अंकांनपैकी आपण ह्या अंकात एकूणच Costing अर्थातच व्यवसायातील जमाखर्च, त्याचा ताळमेळ यावर विचार करणार आहोत. कोणताही व्यवसाय म्हंटला- माग तो शिक्षणक्षेत्रासारख्या पवित्र क्षेत्राशी संबंधित असला तरी त्यालाही सामाजिक बांधिलकीच्या व जबाबदारीच्या बरोबर व्यावहारिक व व्यावसायिक अंग असतेच. एखादा क्लास, प्रशिक्षण केंद्र वा शाळा चालवताना त्यासाठी लागणाऱ्या विविध खर्चांचा आय-व्यय (Income-Expenses) तसेच संस्थेचा देखभाल व प्रगतीच्या दृष्टीने आर्थिक फायद्याचाही विचार करावा लागतोच.

आपण केलेली विविध प्रकारची गुंतवणूक, नियमित देखभालीचा खर्च, वारंवार करावे लागणारे खर्च आणि आपली मासिक तसेच वार्षिक मिळकत ह्याचा योग्य ताळमेळ बसतोय का? आर्थिक गणित योग्य जमले आहे का? केवळ वरवर पाहता महिन्याच्या खर्चापेक्षा हाती आलेली जास्त मिळकत म्हणजे खरा फायदा /नफा होतो का? ऑपेक्स कॅपेक्स म्हणजे काय? त्याचे कोष्टक मोडून तुम्ही विचार करता का? ह्या विषयाशी संबधित असा जमाखर्च-ताळमेळ हा सविस्तर व माहितीपूर्ण ह्या अंकात समाविष्ट केला आहेच. तो वाचा. विचार करा. त्यात दिलेले माहिती, सूचना व त्यातील विचार तुमच्या रोजच्या व्यवसायात घडणाऱ्या उलाढालींशी, घडामोडींशी पडताळून पहा. विश्लेषण करा.आत्मपरीक्षण करा. जरूर तेथे सुधारणा करा. आणि हो ! काही शंका असल्यास जरूर विचार. आर्थिक फायदा होतो का? हे पहातांनाच त्या फायद्यातून मी व्यावसाय जास्त वाढू शकतो का? व्यवसाय वृंन्धिगत करत असतानाच विद्यार्थांच्या फक्त संख्यात्मक वाढीवर भर न देता गुनात्मक वाढीसाठी प्रयत्न करा. एकूणच व्यवसायाचा

 1. आपल्याकडे असलेल्या रिसोर्सेसचा (संसाधनांचा) योग्य व जास्तीत जास्त वापर करा. माचीने व मॅन पॉवर आयडल राहत असेल तर त्या वेळात मशिन व व्यक्तींचा डेटा एन्ट्री, व्हिडिओ एडिटिंगसाठी वापर करता येणे शक्य आहे का? याचा विचार करा. त्यासाठी विद्यार्थ्यांचा उपयोग करून घेतल्यास दुहेरी फायदा होऊ शकेल.
 2. वाढत्या महागाईनुसार ऑपरेशनल कॉस्ट वाढत जाऊ शकते ह्याचा विचार करून बजेट आखा.
 3. सध्याचा मॉल संकृती व अमेरिकन संस्कृतीच्या ‘युझ अॅन्ड थ्रो’ च्या प्रभावाखाली विनाकारण उढळपट्टी करू नका.वस्तू साधने जपून वापरा. अनावश्यक डामडौल-शो टाळा.
 4. बाजारात सर्वोकुष्ट सर्वोत्कृष्ट व महागडे मशीन उपलब्द्ध आहे, ते माझ्याकडे हवेच हा हव्यास विनाकारण धरू नका. जरुरीपेक्षा जास्त कुवतीची व ताकदीची मशिन्स खरेदी करू नका. वर म्हंटल्याप्रमाणे मशिन व मानवी साधनांचा पुरेपूर उपयोग करून घ्या.
 5. सर्व उपकरणांच्या देखभालीकडेही लक्ष द्या. वेळच्यावेळी केलेल्या देखाभालीमुळे वस्तूंचे आयुष्य वाढते त्यामुळे आपोआपच तुमचा नफाही वाढतो.
 6. विजेचा, पाण्याचा व स्टेशनरीचा वापर अत्यंत जागरुकतेने व काटकसरीने करा. शुल्लक खर्च आहे म्हणून तो अनावश्यक असल्यास टाळा.
 7. मार्केटिंग व जाहिरातीवर होणाऱ्या खर्चाचा पै पैचा योग्य हिशोब ठेऊन तो योग्य प्रमाणात वसूल होतो का याचा विचार करा.
 8. वर्किंग कॅपिटल अनावश्यक ठिकाणी वापरालेजात नाही ना हे पहा.
 9. सारासार विचार करून एकूण खर्चाचा हिशोब ठेवताना दर्शनी खर्चाबरोबर अदर्शनी खर्चाचा (Hidden Cost) विचार करा.
 10. एखादे सेंटर चालवताना मी जसा माझ्या कॉस्टिंगचा, घातलेल्या भांडवलाचा विचार करतो, त्याच्या योग्य परताव्याची अपेक्षा करतो त्याचप्रमाणे विद्यार्थी मला देत असलेल्या फी च्या पैशांचा त्यांना योग्य मोबदला मी देतो का? ह्याचाही विचार व्यवसाय वृद्धिच्या दृष्टीने व व्यवसायाचा दर्जा उंचावण्यासाठी आवश्यक आहे. थोडक्यात काय तर सारासार बुद्धिने नीट विचार करून योग्य गोष्टी पाळा व अनावश्यक गोष्टी टाळा.

अधिक फायदा कमविण्यासाठी व्यवसायाच वाढवावा लागतो असे नाही, तर खर्चावर नियंत्रण ठेऊन अधिक हुशारीने केलेला तेवढाच व्यवसाय अधिक फायदा व व्यवसायाचे दीर्घायुष्य याची खात्री देतो.

सखी सैंया तो खूब कमावत है,
पार महंगाई डायन खाए जात है.

खरच क्षेत्र कोणतही असो, व्यक्ती कोणतीही असो, प्रत्येकाच्या तोंडी हल्ली एकाच वाक्य असतं “काय ही महागाई”, दिवसेंदिवस महागाई ही वाढतच आहे.

महागाई वाढते आहे, चलनवाढ होते आहे ही गोष्ट तर खारीच पण ह्या महागाईच्या काळात एक गंमतीशीर विरोधाभास जाणवतो. बघा तुमच्याही लक्षात येईल. अन्नधान्य, भाजीपाला, जागेच्या किंमती, दुध, प्रवासभाडे वगैरे अनेक गोष्टी खर्चिक होत असतना ईलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किंमती त्या मानाने वाढल्या नाहीत. किंबहुना काही गॅझेटस्, टी.व्ही., व मोबाईल सारख्या गोष्टींच्या किंमती काही प्रमाणात कमी झाल्या किंवा पूर्वीपेक्षा जास्त फिचर्स असणारे फोन, टी.व्ही. कदाचित तुलनेने कमी वा त्याच किंमतीत मिळू लागले. इतर महागाईच्या मानाने त्यांच्या किंमतीतील वाढ तुलनेने मर्यादित आहे. आता अस कशामुळे बरं होत? अगदी साधंसोपं उत्तर म्हणजे ह्या वस्तू निर्माण करणाऱ्या अनेक कंपन्या व त्यांच्यातील तीव्र स्पर्धा. साहजिकच स्पर्धेच्या बाजारात आपला दर्जा सांभाळत किंवा उंचावत किंमती मात्र वाजवी, रास्त तेवाव्या लागतात. कारण तसे न केल्यास इतर प्रतिस्पर्धी तुमचे मार्केट काबीज करण्यास तापून बसलेले असतातच.

आपला व्यवसाय हा एखाद्या वस्तूच्या उत्पादनाशी  संबधित नसला तरी आपल्या व्यवसायातही स्पर्धा आहे, चाढाओढ आहेच. माग आपला व्यवसाय नीट चालावायचा असेल, वाढवायचा असेल तर स्पर्धेत टिकून राहणे महत्वाचे. त्यासाठी व्यवसायातील अर्थकारण जमले तरच तुमच्या व्यवसायाला अर्थ आहे म्हणूनच हा ‘ अर्थमंत्र ’.

साहजिकच एखादे कॉम्प्युटर सेंटर, शैक्षणिक क्लास चालवताना एकूणच जमा खर्च, भांडवली गुंतवणूक, मिळणारा परतावा (Returns), ह्याकडे सजगतेने अन् चोखंदळपणे बघणे अत्यंत जरुरीचे ठरते. एकूण आय म्हणजे मिळकत व भांडवली खर्च आणि पुन्हा-पुन्हा उद्भवणारे खर्च यांचा ताळमेळ योग्य बसत नसेल तर कोणताही व्यवसाय चालवणे कठीण होईल, मग फायदा होणे तर फार दूरची गोष्ट म्हणावी लागेल.

कॉस्टिंगचा विचार करतना प्रामुख्याने दोन प्रकारच्या खर्चाचा विचार करावा लागतो.

 1. कॉपिटल कॉस्ट – म्हणजेच तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी केलेली भांडवली गुंतवणूक व त्यांचा खर्च.
 2. ऑपरेशनल कॉस्ट – व्यवसायाचा गडा सुरळीतपणे चालवण्यासाठी येणारा देखभालीचा खर्च.

तुम्हाला मिळणारी एकूण रक्कम (मिळकत, आवक) ह्यातून व्यवसाय चालविण्यासाठी व देखभालीसाठी करावे लागणारे खर्च अधिक भांडवलासाठी गुंतवलेल्या एकंदर रकमेचा काही ठराविक टक्के भाग वजा केल्यास उरतो तो तुमचा निव्वळ फायदा होय.

Profit = Total Income – (Operational Cost + Certain percentage of Capital Investmant or Cost)    

उदाहरण म्हणून एकाद्या केंद्राचा काल्पनिक कॅपेक्स ऑपेक्सचा शेजारी छापलेला तक्ता पाहूया. आता वर म्हटल्याप्रमाणे हिशोब लक्षात घ्यायचा तर कॉपिटल कॉस्ट वजा कारताना टी नेमकी कशी व किती प्रमाणात करावयाची हे समजून घेतले पाहिजे. ह्या तक्त्यानुसार केंद्राचा एकूण भांदावालीभांदावली खर्च रु. २,३२,००० एवढा असेल तर तो अर्थातच पहिल्या सहामहिने वर्षात वसूल होणार नाही. माग समजा जर ह्या घेतलेल्या वस्तू म्हणजे कॉम्प्युटर व इतर उपकरणे, आपण साधारणपणे ४ वर्ष वापरणार असू तर ह्या रकमेचा १/४ भाग हा एका वर्षाचा खर्च धरून दर वर्षीच्या एकूण आवक रकमेतून ऑपरेशनल खर्चाबरोबर वजा केल्यास उरेल तो आपला निव्वळ नफा. आता ह्याचा जास्त बारकाईने विचार करावयाचा तर कॉम्प्युटर वगैरे गोष्टी ४ वर्षे चालणार असतील तरी फेर्निचर कदाचित ८ वर्ष चालेल ह्या हिशोबाने तसेच दर वर्षी त्या त्या वस्तूंची देप्रीचीअतेद  डेप्रिसिएटेड वाळूये व्हॅल्यु विचारात घेऊन तो त्या वर्षीचा भांडवली खर्च ह्या हिशोबाने तो वार्षिक मिळकतीतून वजा करावा.

शेजारील ताक्त्यावरून आपण सर्वांना कॅपेक्स ऑपेक्सची सहज कल्पना येते. ह्या तक्त्यात दाखवलेल्या केंद्राचा वार्षिक भांडवली खर्च रु.२,३२,००० / ४ = ५८,००० + वार्षिक ऑपरेशनल खर्च रु. ५,३७,४२० हा सगळा त्या केंद्राला मिळणाऱ्या एकूण वार्षिक मिळकतीतून वजा जाता उरेल तो निव्वळ फायदा होय.

सुरवातीला अर्थातच निव्वळ फायदा जास्त असणार नाही पण जसजसा भांडवली खर्च फिटत जातो तसा साहजिकच फायदा वाढतो. परंतु बरेचदा अनेक जण अति उत्साहाच्या भारत सुरवातीचा त्यामानाने किरकोळ फायदा विनाकारण दिखाऊ व डामडौलांच्या गोष्टींवर खर्च करतात. त्या बाबतीत  मात्र प्रत्येकाने सजग व सावध राहिले पाहिजे.

आपला व्यवसाय वाढवावा, नावारुपास आणावा असे सगळ्यांना वाटते त्यासाठी एकूण मिळकत वाढविणे, विद्यार्थी संख्या वाढविणे हे ओघाने आलेच. परंतु फक्त आवक वाढवणे म्हणजेच फायदा होतो असे नाव्हे. तर त्याच मिळकतीत योग्य बजेटिंग करून शक्य ते आणि शक्य तेथील खर्च टाळणे ह्यातूनही शिल्लक वाढून फायदा वाढू शकतो. इंग्रजी मध्ये म्हणाच आहे A peeny saved is panny earned ह्यासाठी वरील गोष्टी जरूर लक्षात घ्या.

आपण आपले MS-CIT चे केंद्र २०१३ साठी नुतनीकरण करून जो आमच्यावर विश्वास दर्शवला त्याबद्दल प्रथम आपले सर्वांचे मनःपूर्वक आभार.

मित्रांनो ! येणारे २०१३ साल हे MS-CIT साठी तंत्रज्ञानावर आधारित एक आव्हानात्मक वर्ष म्हणून असणार आहे. त्यासाठी MS-CIT ने बीझनेस प्लानद्वारा त्या आव्हानाला कसे तोंड द्यावे ह्याची तयारी आपणाकडून करून घेतेलेलीच आहे. पार्थ अशा आव्हानांना तोंड देण्यासाठी सदैव तत्पर आहे.

आपणास माहीतच आहे की, पार्थने २०१२ मध्ये LMS (Learning Management System) आणि CSS (Center Support System) सारखे एक नाविन्यपूर्ण सर्विस टुल आपल्या नेटवर्क मध्ये आणले. ज्याचा फायदा पार्थ नेटवर्क माधील ८०% पेक्षा जास्त केंद्रांनी घेतला.

येणाऱ्या वर्षात आम्ही घेऊन येत आहोत Reward Point System, Parth eLive (Virtual Classroom Lecture) आणि नवीन स्वरूपातील Network DNA ज्याची सविस्तर माहिती ई-मेलवर लवकरच येईल.

पार्थ समूहातर्फे आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच २०१३ साल हे आपणा सर्वांना आरोग्यादायी व भरभराटीचे जावो ही (intakefull) शुभेच्छा.

श्री. बबन मगदुम

चेअरमन, पार्थ ग्रुप          

3 डिसेंबर १९९२ ला नील पॉपवर्थ नामक इंजिनियरने ब्रिटन मधील एका टेलीकम्यूनिकेशनमध्ये काम करत असलेल्या मोठ्या संगणकावर Merry Christmas असे टईप केले आणि इंटर चे बटन दाबताक्षणीच टे लंडन माधील व्होडाफोनच्या एका डायरेक्टरच्या हाताच्या पंज्यापेक्षा मोठ्या असलेल्या मोबाईल फोनवर चमत्कार झाल्याप्रमाणे ते अवतीर्ण झाले आणि जगातला पहिला एस एम एस तयार झाला. अर्थात एका हाडाच्या इंजिनिअरच्या दृष्टीने त्याने एक प्रयोग केला आणि तो यशस्वी झाला. ह्यापुढे काहीचे नव्हते. पण कम्पनीच्या उद्योजक मनास त्यातून एक मोठी धंद्याची संधी दिसली. पुढे बघता बघता एस एम एस चे प्रस्थ वाढत गेले. अर्थातच हा पॉपवर्थ काही एस एम एस कल्पनेचा जनक नव्हता तर त्याचे श्रेय फिनलंडच्या एका माजी सरकारी अधिकाऱ्यास, मॅट्टी मॅकोनेनला जाते, ज्याने ही कल्पना सर्व प्रथम १९८४ साली मंडळी होती. तरी देखील त्या शोधाचे श्रेय हा मॅट्टी स्वतःकडे घेत नाही, कारण तो अस्तित्वात त्याने स्वतः आणला नाही म्हणून.

बघता बघता २० वर्षात भारतासह जगभरात एस एम एस ने चांगलेच मूळ धरले आहे. कालांतराने, एस एम एस बरोबरच एम एम एस पण चालू झाले. स्मार्ट फोन्समुळे हे अधिकच सोयिस्कर होऊ लागले. याचा उपयोग जसा सहज  संवादासाठी होऊ लागला तसेच त्याचे महत्व हे आपत्कालीन स्थितीत पण जाणवू लागले.

नमस्कार मंडळी,   

“ आज आपल्या ‘पार्थ’ चा वर्धापनदिन. आपण सर्वांच्या आनंदाचा दिवस. बघता-बघता पार्थाने १९व्या वर्षात पदार्पण केले. त्याचा वाढता व्याप आणि आवाका बघताना समाधान आहेच परंतु ह्या वाढत्या व्यापला, विविध सेंटर्सच्या कार्यांना एकमेकांशी नीट जोडता यावे, एकमेकांच्या सेंटर्समधील कार्याची, उपक्रमाची माहिती व्हावी, त्यातून त्यापून होणाऱ्या देवाण घेवाणीतून आपल्या सर्वांच्या कामात सुसूत्रता यावी व काही नव्या गोष्टी एकमेकांकडून शिकता याव्यात, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व्हावे म्हणून आपण मागच्या वर्षीपासून आपले न्युज लेटर NETWORK DNA सुरु केले. ते आपले NETWORK DNA सुद्धा आता वर्षाचे झाले आहे. मागील वर्षभरात वेगवेगळ्या अंकातून आपण पार्थच्या विविध उपक्रमांवर प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांसाठीच्या नाना करिअरवाटा, चाकोरीबाहेरचे करिअर् पर्याय, यशस्वी उद्योजकांची माहिती, बदलता काळ व त्यानुसार बदलत जाणारे तंत्रज्ञान, त्याचा शिक्षण क्षेत्रावर, व्यवसाय व नोकऱ्यांवर होणारा परिणाम ह्याचाही उहापोह आपण आपल्या अंकातून केला.

फेब्रुवारी – एप्रिल अशा सुरवातीच्या अंकातून आपण K.P.O.,  B.P.O. सारख्या आउटसोर्सिंग कंपन्या नेमके काय व कसे काम करतात, त्या बाबतचे समज, गैर समज यांचे निराकरण केले. तर १० वी, १२ वी, इतर परिक्षा निकालांच्या म्हणजेच जूनच्या सुमारास व्होकेशनल एज्युकेशन म्हणजे काय? त्याचा सर्वांकष अर्थ, उपयोगिता अशा अनेक गोष्टींचा आढावा घेतला. तर ऑगस्ट व ऑक्टोबरच्या अंकात उद्योजकता, उद्योजक  बनण्याचे सूत्र, त्याची योग्य वेळ, त्यासाठी आवश्यक असणारे गुण व कौशल्ये याची चर्चा केली. तर ऑगस्टचा अंक मार्केटिंगचे तंत्र मंत्र याविषयाला वाहिलेला होता. थोडक्यात काय तर वर म्हटल्याप्रमाणे वर्षभरात आपण विविध विषय हाताळले. त्याची चर्चा केली. दिवाळी अंक मात्र मुद्दाम इतर माहिती, मनोरंजन ह्यापुरताच मर्यादित ठेवला होता.

ह्याशिवाय आपल्या अंकातील तुमचे योगदान, मग ते प्रतिक्रियांच्या स्वरूपातील असो वा तुमच्या विशेष कार्याचा उल्लेख, गौरव असो तेही नक्कीच महत्वाचे होते. तसेच तुमच्या शंका, सूचना ह्यामुळेही आपल्या अंकाचे स्वरूप व रूप ताजेतवाने व टवटवीत राहण्यास खचितच मोठी मदत झाली.

आता नवीन वर्षात पदार्पण करताना आपला अंक जास्त चांगला कसा करता येईल त्याची उपयुक्तता कशी वाढवता येईल ह्याचा विचार करत आपण पुढे जाणार आहोत. KNOW YOUR BUSINESS ह्या थीमवर आधारित असे आपले पुढील वर्षभरातील सर्व अंक असतील. गेली काही वर्षे आपण शिक्षणक्षेत्राशी संबंधित व्यवसायात काम करत आहोत. ह्या व्यवसायातील आर्थिक गणिते, त्याचे योग्य व्यवस्थापन दर्जा ह्या बद्दल तुम्ही विचार करत असलाच. परंतु ह्या व्यवसायात सुधारणा करणे, हा व्यवसाय वाढविणे व आपल्या कार्याचे तसेच त्याच्या दर्ज्याचे सातत्य राखणे, किंबहुना तो दर्जा जास्त कसा सुधारता येईल ह्या बाबतच पुढील विविध अंकातून आपण विचार मांडणार आहोत जे निश्चितच सर्वांना मार्गदर्शक ठरतील.

अर्थात ह्या व्यवसायात आर्थिक फायद्याबरोबर सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेऊन तो वाढविणे हे अगत्याचे आहे.कारण शेवटी हा व्यवसाय  शिक्षणक्षेत्रासारख्या पवित्र क्षेत्राशी संबधित आहे. ह्यातून केवळ सुरक्षितच नव्हे तर सुसंस्कृत विद्यार्थी व जबाबदार नागरिक बनविणे हे ही आपले कर्तव्य आहे. तेंव्हा थोड्क्यात काय तर ह्या व्यवसायाचे उद्दिष्ट ‘ बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ असेच असले पाहिजे.

याशिवाय नेहमीप्रमाणे तुमच्या प्रतिक्रिया सूचना आणि शंकासमाधान ह्यासाठी खास जागा आपल्या अंकात आपण राखून ठेवणारच आहोत. हो! मुख्य म्हणजे प्रतिक्रिया म्हणजे फक्त गुडी गुडी कौतुकाचे शेरे नकोत. खरच तुम्हाला मनापासून कोणत्या गोष्टी आवडताहेत? कोणत्या गोष्टीत बदल आवश्यक आहेत ह्याची मोकळेपणाने प्रतिक्रिया द्या. सकारात्मक टीका व योग्य विश्लेषण करून तुम्हे पाठवाल त्या सुचनांचे व प्रतिक्रियांचे नुसते स्वागतच होईल असे नव्हे तर त्या प्रमाणे विचार करून, योग्य बदल करून आपल्या अंकाची उपयुक्तता व दर्जा आपण उंचावत नेऊ म्हणूनच मंडळींनो तुमच्या साठी खास जागा आहे “ मन से ” अशा शीर्षकाच्या खाली. तेव्हा तेथे मनापासुनच्या प्रतिक्रिया पाठवा. तेव्हा ह्या अंकी सध्या येथेच थांबतो.

 1. आपण एखादा व्यवसाय करताना आपला नेमका ग्राहक वर्ग कोणता आहे? कोण आहे? त्याच्या वर्तमान व भविष्यातील गरजा काय आहेत?
 2. आपला व्यवसाय निरंतर चालत नसतो, परंतु आपल्याला तो निरंतर चालवायचा असतो त्यामुळे त्यातील धोके आणि पर्याय यावर आपण विचार केला आहे का?
 3. व्यवसाय करताना त्याचे आर्थिक नियोजन आणि उपलब्ध बाबींचा सुयोग्य वापर आपण करतो का?
 4. आपण आपला ब्रांड निर्माण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करता का?
 5. “ Nobody plants to fail but many of us fail to plan” हे मुलतत्व आपणास माहित आहे का?

व्यवसायाच्या पंचसुत्रीचा वापर करून आपल्या व्यवसायाचे वर्तमान व भविष्य समजून घेणे व व्यवसाय वाढवणे म्हणजेच KNOW YOUR BUSINESS होय.

आजकाल आपण K.Y.C. हे शब्द सतत ऐकतो. बँक असो, विमा कंपनी असो, आर्थिक गुंतवणूकीच्या कंपन्या असोत किंवा सिलेंडर पुरविणाऱ्या वा इतर सेवा असोत. सगळीकडे K.Y.C. हा परवलीचा शब्द झाला आहे. हे K.Y.C. काय तर KNOW YOUR CUSTOMER म्हणजे ग्राहक म्हणून तुम्ही कोण आहात? काय करता? तुमचा आयकर खाते नंबर इत्यादि सर्व गोष्टींची त्यांना हवी असलेली माहिती ते घेतात, जेणे करून त्यांना त्यांचा नेमका ग्राहक कोण, कसा आहे हे समजते.

त्याच चालीवर म्हणायचे तर आपण आपले पुढील अंक वर म्हटल्याप्रमाणे K.Y.B. ह्या सूत्रावर आधारित असे काढणार आहोत. आता हे K.Y.B. म्हणजे KNOW YOUR BUSINESS. आपला बिझिनेस नेमका काय आहे ते जाणून घ्या. आपल्या व्यवसायाचे स्वरूप समजावून घ्या हाच याचा अर्थ होय.

इतर व्यवसायाप्रमाणे आपण एखादे ग्राहकोपयोगी उत्पादन वस्तुरुपात बनवत नाही. त्याअर्थाने आपल्या व्यवसायाचे स्वरूप पूर्ण व्यापारी स्वरूपाचे नक्कीच नाही व नसणार. कारण आपण प्रत्यक्ष विद्यार्थ्याबरोबर व्यवहार (डील) करतो. विद्यार्थ्यांना शिकवतो, तयार करतो. उद्याच्या साधन, समृद्ध समाजासाठी प्रगत देशासाठी आपण त्यांना घडवतो हे खरे. परंतु हे करताना सुद्धा विद्यार्थ्यांसाठी विविध वर्ग चालवताना त्यांना नवनवीन तंत्रे व तंत्रज्ञान शिकवण्यासाठी जागा, सेंटर्स, कॉम्प्यूटर्स, इतर मशिनरी, पुस्तके, नोट्स, बोर्ड्स, बेंचेस, आणि इतर अशा अनेक गोष्टी लागतात. त्याअर्थाने एखादा क्लास / सेंटर चालवायचे म्हणजे भांडवलाची, जागेचे गुंतवणूक आली. वर म्हटल्याप्रमाणे विविध प्रकारची साधने, त्यांची खरेदी, त्याचा देखभालीचा खर्च, शिक्षक, सेंटर चालक, देखरेख करणारे यासर्वांचे पगार असे अनेक खर्च आले. तेव्हा त्या दृष्टीने विचार करता सेंटर्सचा विद्यार्थी घडवण्याबरोबरच व्यवसायिक अंगानेही विचार करणे अगत्याचे व आवश्यक ठरते. त्यादृष्टीने आपण सर्व सेंटर चालक–मालक ह्यांनी आपल्या व्यवसायाचा नीट विचार केला पाहिजे. आपला व्यवसाय अर्थातच आपला  क्लास व सेंटर चालवताना आपले टार्गेट कस्टमर म्हणजे नेमके ग्राहक कोण आहेत? तर विद्यार्थी. मग विद्यार्थ्यांना समजून घेणे, त्यांना काय हवे आहे? काळानुरूप काय शिकण्याची – शिकविण्याची गरज आहे? त्यांची कोणत्या कोर्सेससाठी मागणी आहे त्याबाबत ते कसा निर्णय घेतात, याचा सखोल अभ्यास करून, सर्वेक्षण करून त्यानुसार आपल्याकडील उपलब्द्ध पर्यायांमध्ये बहुसंख्य विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त उपयुक्त ठरतील अशा अभ्यासक्रमांच्या निवडीसाठी त्यांना योग्य मार्गदर्शन करणे हेच प्रामुख्याने आपले असले पाहिजे.

विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी आपण नेमके काय करतो? काय करायला पाहिजे? व आपल्या प्रयत्नानुसार विद्यार्थीसंख्या वाढली तरी ती टिकविण्यासाठी आपणास कामाच्या दर्जाचे सातत्य राखणे आवश्यक आहे. ते राखले तर आपल्याकडील अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेले समाधानी विद्यार्थी हेच आपल्या भविष्यातील नव्या विद्यार्थ्यांसाठी चालती बोलती जाहिरात ठरू शकतात. अशा पद्धतीने कॉस्ट ऑफ  अक्विझिशन ऑफ कस्टमर ही आपोआपच कमी होते. येणाऱ्या बहुसंख्य विद्यार्थ्यांच्या सोईनुसार अभ्यासक्रमाचे वेळापत्रक आखले गेले पाहिजे. उदा. नोकरदार मंडळींसाठी संध्याकाळची वेळ वा सुट्टीच्या दिवशी वर्गांचे आयोजन केल्यास विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद मिळणे सहज शक्य आहे.

विद्यार्थ्यांनी पूर्ण केलेल्या अभ्यासक्रमानंतर अथवा शिकवलेली कौशल्ये आत्मसात केल्यानंतर आपण ती त्यांना प्रत्यक्ष व्यवहारात वापरण्याच्या दृष्टीने किंवा त्यातून अर्थार्जन करण्याचे दृष्टीने आपण काही नियोजन करू शकतो का? बदलत्या तंत्रज्ञानानुसार व काळाच्या मागणीनुसार भविष्यातील अभ्यासक्रमांबद्दल आपण विचार केला पाहिजे. त्यानुसार विद्यार्थ्यांना जरुरीप्रमाणे वेळोवेळी मार्गदर्शन करणे हेही अगत्याचे ठरते.

वर उल्लेख केलेल्या पंचसुत्रांपैकी आपल्या व्यवसायात येणाऱ्या अडचणी, धोके, आव्हाने ह्याबाबतचा विचार, तशा अडचणी आल्यास काय तरतुदी करायच्या याची आपण योजना केली आहे का? एकूणच व्यवसायाच्या विविध अंगाने येणाऱ्या अडचणींबाबत, व्यवसाय योग्य चालविण्याच्या दृष्टीने व वाढविण्याच्या दृष्टीने आपल्याकडे कोणत्या योजना आहेत? काळानुसार काही नव्या योजना, नवे उपक्रम राबविण्याच्या दृष्टीने कोणते प्लॅनिंग आपल्याकडे आहे ह्या महत्वाच्या सूत्रांचा व त्या अनुषंगाने येणाऱ्या इतर बाबींचा सखोल अभ्यास करणे, त्यानुसार आपला व्यवसाय समजून घेणे व तो वाढवणे म्हणजेच K.Y.B. होय. आपले पुढील अंक ह्यातील एकेक सूत्राला वाहिलेले असतील. तेव्हा यातून आपल्या सर्वांच्याच विचारांना चालना मिळेलच, त्याच बरोबर अंक वाचणारे इतरही सर्वजण विचारास प्रवृत्त होतील. इतकेच काय पण आपल्याच हाताखालून शिकून जाणारा विद्यार्थीही उद्या स्वतःचा कोणताही व्यवसाय सुरु करताना ह्यातील काही सूत्रांचा व गोष्टींचा विचार करून यशस्वी उद्योगाकडे जाणारी वाटचाल चालू शकेल हे नक्की.                                         ***

आजच्या आनलाईन जगात इंटरनेट हे माहितीचे भांडार झाले आहे. सर्व लहान मोठ्या कंपन्या त्यांचे ब्रान्डस, त्यांची उत्पादने आणि सेवा ह्यांच्या माहितीसाठी आणि मार्केटिंगसाठी इंटरनेटचा प्रभावी वापर करून त्या भांडारात भर टाकत आहोत. लाखो ब्लॉगर्स विविध विषयांवर लेखन करून त्या भांडाराला दिवसेंदिवस समृद्ध करीत आहोत. ही सर्व माहिती, अफाट पसरलेल्या आणि गहन खोली असलेल्या महासागराप्रमाणे आहे. आता ह्या माहितीच्या अफाट सागरातून आपल्याला हवी असलेली नेमकी माहिती शोधायची म्हणजे अक्षरशः ‘ दर्या में खसखस ’ शोधण्यासारखेच आहे. इथेच हे सर्च इंजीन अल्लादीनच्या जादूच्या दिव्यातील जीनप्रमाणे आपल्या मदतीसाठी पुढे येते. ही मदत करण्यासाठी इंटरनेट सर्च इंजीन अविरत कार्यरत असते. ह्या कामाची विभागणी खालील तीन मुलभूत प्रकारांत केलेली असते.

 1. माग काढणे : (Web Crawling) इंटरनेटवरील सर्व वेब पेजेसचा माग काढून, त्यांना भेट देऊन त्यावरील माहिती गोळा करणे.
 2. पृथक्करण आणि सूची करणे : (Analysis Indexing) गोळा केलेल्या माहितीचे पृथक्करण (Analysis) आणि सुसुत्रीकरण (Alignment) करून त्या माहितीचा जलद शोध घेण्यासाठी सूची (Index) बनवणे.
 3. शोध निकाल : (Search Result) शोध घेणाऱ्या इंटरनेट वापरकर्त्यांना (Users) सूची वापरून योग्य तो शोध निकाल (Search Result) कमीत कमी वेळात दाखवणे.
 1. अनेक यशस्वी उद्योजकांच्या मते २१ वे शतक हीच खरी व्यवसाय सुरु करण्याची अगदी योग्य वेळ आहे. नवनवे शोध, बदलते आधुनिक तंत्रज्ञान व त्यानुसार निर्माण झालेल्या आणि होणाऱ्या छोट्या-मोठ्या व्यवसायाच्या नेमक्या संधी हेरून त्यानुसार तरुणांनी व्यवसायात धडाडीने उडी घेतली पाहिजे.
 2. ह्या आधीच्या बहुसंख्य लोकांचे असे मत होते की ज्याचा पिढीजात धंदा आहे त्याच्याच मुलांनी धंद्यात पडावे व तो धंदा पुढे आणावा. इतरांना नव्याने व्यवसायात पडणे सोपे नाही, परंतु आता सध्याच्या काळात ही गोष्ट जरुरीची नाही. बिल गेटस, धीरूभाई अंबानी, नारायण मुर्ती व इतर अनेक अशी उदाहरणे आहेत की स्वतःव्यवसाय सुरु करून आपल्याच स्वतःच्या कारकीर्दीत तो व्यवसाय मोठा केला आहे. तेंव्हा तरुणांनी धंद्याची पार्श्वभूमी नाही म्हणून कच खाण्याचे कारण नाही.
 3. धंद्यासाठी लागणारे भांडवल ही महत्वाची गोष्ट आहे. पूर्वीच्या तुलनेने आज विविध बँका उद्योजकांना कर्ज देण्यास तयार आहेत. तेव्हा भांडवल ह्या महत्वाच्या बाबीची पूर्तता होऊ शकते.
 4. एक काळ सरकारी नोकऱ्यांमध्येच लोक पूर्ण समाधानी व आनंदी होते. परंतु काही विशिष्ट उच्च्यपदे सोडल्यास सरकारी नोकऱ्यात खासगी नोकऱ्यांइतका आकर्षक आर्थिक मोबदला नाही, ग्लॅमर नाही आणि पूर्वीच्या तुलनेत सरकारी नोकऱ्याही कमी होत चालल्या आहेत. दुसरीकडे खासगी नोकऱ्यांचे आकर्षण असले तरी त्यातील Risk Factor फार मोठा असल्यामुळे कोणाच्याच नोकरीची म्हणावी अशी सुरक्षितता नाही.
 5. ह्या सर्व परिस्थितीत स्वत:च स्वतःचा व्यवसाय सुरु करणे नक्कीच चांगले. आपण स्वतः व्यवसाय सुरु करतो तेव्हा स्वतःच नवनवी आव्हाने स्विकारत पुढे जातो. ह्यातून स्वतःचा आत्मविश्वास तर वाढतोच शिवाय स्वतःबरोबर आणखी काही लोकांना “मी उद्योग व्यवसाय देऊ शकतो हे समाधान असतेच.’’ तेव्हा स्वतःची प्रगती साधतांनाच इतरांचीही प्रगती साधता येते. अशा प्रकारे उद्योजक बनल्याने यशाकडे वाटचाल करतांनाच ह्ळूहळू आर्थिक प्रगतीबरोबरच समाजात मानसन्मान व प्रतिष्ठा मिळते.

“तेव्हा तरुणांनो हीच वेळ आहे आपल्या आवडी व कुवतीनुसार व्यवसाय क्षेत्र निवडण्याची व त्यात आत्मविश्वासाने व धडाडीने उडी घेण्याची”.